Tags

, , , , , , , , , , , , , , , ,

vapukale

“कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही……. पण गगन भरारीच वेड रक्तातच असाव लागत….
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही !”

मागच्या काही दिवसात  ह्या ओळी वाचनात आल्या. माझ्या BE मधील SlamBook च्या headline असलेल्या या ओळी कोणाच्या आहेत ह्या त्या वेळेस मला माहित नव्हते. शोधांती मी व.पु. पर्यंत पोहचलो. त्यांच्या साहित्याबद्दल मी काय समीक्षण करणार? जेव्हापासून वाचतोय तेव्हापासून व.पु. वाचतोयच आहे. कित्येक वेळा पारायण केलं तरी व.पु. च्या कथेत दर वेळी नवीन काहीतरी भेटतं.

मला व.पु.ची सर्वच पुस्तके आवडली. प्रत्येक पुस्तक काही ना काही नवीन शिकवून आणि सांगून जात. प्रत्येक कथा सुंदर आहे, व.पु.ची भाषाशैलीची अप्रतिम आहे. पुस्तकांबरोबरच व.पुं चं कथाकथन देखील अफ़लातून आहे. झिंटू, तूच माझी वहिदा, दोंदे…. अशा कित्येक कथा कित्येक वेळा ऐकल्या आहेत.

मला कायम विचार पडतो कि, एखादा व्यक्ती जीवनाविषयी/आयुष्यावर एवढे छान कसे काय लिहू शकतो? आणि ते फक्त व.पु.नेच करावे..

 

व.पु.च्या संदर्भात काही लिंक्स, काही मिळालेल्या तर काही जमवलेल्या
Blog: www.vapurzaa.blogspot.com
Facebook: https://www.facebook.com/vapuvichar
Android Application,
https://play.google.com/store/apps/details?id=in.ameyapps.vapu.quotes

~ एक व.पु.प्रेमी
(संकलन – स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)